आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प., मनपा शाळांचे बदलते रुपडे:समाजात वावरणे, व्यावहारिक ज्ञान आता ठरणार प्राथमिक शिक्षणाचा पाया

औरंगाबाद / संताेष भांडवले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर खासगी शाळांचे पेव फुटले हाेते अन् त्या शाळांची चलतीही होती. त्याला कारणही तसेच होते. तेथील शैक्षणिक दर्जाच्या तुलनेत सोयीसुविधा अधिक असल्याने मध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीयांचा कल या आधुनिक शाळांकडे वाढल्याचे दिसून आले. परिणामी, जि.प. शाळांसह मनपाच्या काही शाळांत विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचे आदेश निघाले होते. मात्र, आता जि.प. व मनपा शाळांमध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक, समाजात वावरण्याचे ज्ञान, शेतीला जोडधंद्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा घटती शालेय विद्यार्थी संख्या वाढण्यास निश्चितच मदत होईल. खासगीप्रमाणेच शासनाच्या शाळांमध्ये ज्ञानार्जनाची द्वारे खुली होतील.

मुकुल मंदिरच्या मुलांना कुटुंबीयांपासून दूर राहण्याची सवय लहानपणीच लागावी, यासाठी दप्तराविना रात्रशाळा भरवली. यासारखे अनेक उपक्रम राबवल्यास निश्चित परदेशातील मुलांप्रमाणेच लहान वयातच पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारी ज्ञान मिळेल.

मुकुंदवाडी मनपा शाळेच्या मुलींना शहरातील मोठ्या कापड दुकानात कसे व्यवहार चालतात, काय भांडवल लागते, ग्राहक हाताळण्याची पद्धतीबाबत प्रत्यक्ष जालना रोडवरील एका कपड्यांच्या दालनाला भेट देऊन रिटेल कापड व्यवहाराचे धडे देण्यात आले आहे.

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगावात नुकतेच जि.प. शाळेत मुलांना शिक्षणासोबत व्यावहारिक व शेतीची माहिती व्हावी, या उद्देशाने गांडूळ खत प्रकल्पाचे बाजार सामितीचे माजी संचालक शेषराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यातून मुलांना शेतीविषयक माहिती मिळेल.

शाळा बंद करण्याच्या सूचना नाहीत पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याच्या अद्याप वरिष्ठ स्तरावरून सूचना नाहीत. केवळ माहिती एकत्रित केली आहे. आता पुस्तकी ज्ञानासाेबतच व्यावहारिक ज्ञान व समाजात वावरण्यासाठीचे ज्ञान देण्यावर भर आहे. -जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी

मुलगा फावल्या वेळात मदत करताे मुलगा फावल्या वेळात शेतीत मदत करतो, त्याला शेतीचे ज्ञान असावे, यासाठी शालेय समितीच्या बैठकीत मुद्दा मांडला होता. आता तालुक्यातील ग्रामीण भागात मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत शेतीविषयक ज्ञान मिळणार हे महत्त्वाचे आहे. -सूरज पाटील, पालक, गंगापूर

बातम्या आणखी आहेत...