आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रहार जनशक्ती पक्षाचे पक्ष प्रमुख तथा माजी राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नमुळे मागील 25 वर्षांपासून सातत्याने दिव्यांगांसाठी 'स्वतंत्र मंत्रालय' मिळावे याकरिता मागणी केली जात होती. ही मागणी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करत दिव्यांकांसाठी स्वतंत्र मंत्रालय उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत जल्लोष करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधव क्रांती चौकात शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने एकवटले होते.
फेटे बांधलेल्या दिव्यांग बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात आमदार बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जयघोष करत गुलाल उधळून फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. वेळावेळी शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत जन आक्रोश करीत, आसूड यात्रा काढून प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करत गेली पंचवीस वर्षे लढा उभारत महाराष्ट्रच सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे आखेर स्वतंत्र मंत्रालय मान्य झाले. आमदार बच्चू कडू हे खरच महाराष्ट्राचे दिव्यांग हृदयसम्राट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अपंगांचे 'नाथ' असल्याची भावना यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी व्यक्त केली.
या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वच जाती-धर्माच्या व सर्वच पक्षाचे समर्थन करणाऱ्या शेवटच्या दिव्यांगापर्यंत लाभ मिळणार आहे. यावेळी शकील शेख, राधा खरात, देवकी राठोड, अनिता खरात, संदीप इंगळे, शाहूराज चित्ते, पारसचंद साकला, कुणाल राऊत, सुधाकर शिंदे, बाळासाहेब भोसले, संकेत खापर्डे, दत्ता साखळकर, ज्योतीराम जाधव, जुबेर पटेल आदींसह मोठ्या संख्येने महिला पुरुष दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.
आता शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील
दिव्यांगंसाठी स्वतंत्र मंत्रालय त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याला तयार होणार असल्यामुळे दिव्यांगांच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील. या अगोदर बहुतांश योजना शहरी भागातील दिव्यांगापर्यंतच पोहोचत होत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग या योजनांपासून वंचित राहत होते. परंतु आता दिव्यांग भवनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटचा घटकापर्यंत दिव्यांगांच्या योजना पोहोचतील. तसेच दिव्यांगांना मिळणारे विविध लाभ प्रामुख्याने सहज मिळतील असे मत शाहूराज चित्ते, शकील शेख, राधा खरात, देवकी राठोड, संदीप इंगळे, सुनीता खरात आदींनी व्यक्त केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.