आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘दलित आणि मुस्लिम नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे या दोन्ही समाजांवर अधिराज्य गाजवण्याची अॅड. प्रकाश आंबेडकरांना संधी होती. ते सहजपणे दलित, मुस्लिमांचे किंग होऊ शकले असते. पण त्यांनी ती संधी हाताने घालवली आहे,’ अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मंगळवारी (६ डिसेंबर) अॅड. आंबेडकरांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
महापालिकेत २०१७मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी विद्यमान राजकीय घडामोडींवर भूमिका स्पष्ट केली. सध्या उद्धवसेना आणि अॅड. आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीच्या युतीची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांची नुकतीच मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली, असे निदर्शनास आणून दिले असता इम्तियाज म्हणाले, मुळात मुस्लिम आणि दलित हेच खरे नैसर्गिक मित्र आहेत. हे आंबेडकरांनी का लक्षात घेतले नाही, हे कळत नाही. २०१९मध्ये लोकांमध्ये निर्माण झालेल्या उत्साहावर त्यांनी पाणी फेरून टाकले आहे.
मुंबईला काही वॉर्डांत एमआयएम-वंचितचा सामना उद्धव ठाकरे आणि अॅड. प्रकाश आंबेडकरांमध्ये येत्या काळात चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यांच्यात युती झाली तर मुंबई महापालिका निवडणुकीत काही वॉर्डांत एमआयएम-वंचितचा सामना होईल.
...तर माझी नार्को टेस्ट करा धर्मांतर प्रकरणात माझ्यावर आरोप करणाऱ्याची आणि माझीही नार्को टेस्ट करा, असे आव्हान देत इम्तियाज म्हणाले की, सहकारमंत्री अतुल सावे यात पोलिस यंत्रणेवर दबाव टाकत आहेत, ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक बाब आहे.
राज्यपालपदच रद्द करा राजकीय हेतूने नियुक्ती केले जाणारे राज्यपाल पद रद्द करून त्यावर मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती केली पाहिजे, असे सांगत इम्तियाज म्हणाले की, कोश्यारींच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी आम्ही ७ डिसेंबर रोजी क्रांती चौकात निदर्शने करणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.