आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात एरव्ही वैचारिक, आरोग्य चिंतनाचे कार्यक्रम होतात. पण “डिकास्टा’ नाटकाच्या प्रयोगाने दोन तास हास्याचे फवारे उडाले. मात्र, शेवटी गंभीर झालेल्या या नाटकाने उपस्थितांना स्तब्ध केले. सोशल ड्रिंकिंगच्या विषयावर आधारलेल्या या नाटकातून डॉक्टरांनी सुरक्षेचा संदेश दिला. विशेष म्हणजे या नाटकाचे लिखाण, दिग्दर्शन, अभिनय सर्वच धुरा डॉक्टरांनी सांभाळली होती.
विलक्षण धावपळीत असलेल्या १५ डॉक्टरांनी ३ महिने रोज दोन ते अडीच तास सराव करून हे नाटक उभे केले होते. डॉ. अनंत कडेठाणकर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकात शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश रोपळेकर पोलिस इन्पेक्टरच्या तर भूलतज्ज्ञ डॉ. संदीप मुळे हवालदाराच्या भूमिकेत दिसले. ३०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या रहस्यमयी पण विनोदी नाटकाने अनेक संवादांवर टाळ्या मिळवल्या.
यांच्या होत्या भूमिका : डॉ. प्रशांत सोनवतीकर(रेडिओलॉजिस्ट), डॉ. अजय चिंचोळे(ऑर्थोपेडिक), डॉ. सचिन जोशी (चेस्ट फिजिशियन), डॉ. मंजूषा शेरकर (पीडियाट्रिक), डॉ. श्रद्धा परीटकर (स्त्रीरोग), डॉ. प्रगती फुलगीकर (पॅथॉलॉजी), डॉ. कांचन रोपळेकर-सहप्रवासी, डॉ. रमेश रोहिवाल (ईएनटी)- पायलट, डॉ. प्रीती खटावकर (रेडिओलॉजी)- एअरहोस्टेस, डाॅ. सतीश रोपळेकर(कार्डिओलॉजिस्ट)- पोलिस इन्स्पेक्टर, डॉ. संदीप मुळे (भूलतज्ज्ञ)-हवालदार, डॉ. अनंत कडेठाणकर (फिजिशियन)-डिकास्टा, डॉ. अमोल देशमुख (सायकियाट्रिक), डॉ. अशोक शेरकर-दिग्दर्शन
भावनांचे आकलन वेगवान
डॉक्टरांना मानवी भावभावनांचे आकलन सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक आहे. दोनच दिवसांच्या सरावात नाटक उत्तम झाले. हे खऱ्या अर्थाने डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी केलेले नाटक ठरले. प्रा. डॉ. गणेश शिंदे, मार्गदर्शक
जाणीव देण्याचा प्रयत्न
सोशल ड्रिंकिंगचा मुद्दा गंभीर झाला तर डॉक्टरांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल म्हणून नाटक लिहिले.प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी यामध्ये मोलाचे सहकार्य केले. डॉ. अनंत कडेठाणकर, लेखक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.