आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाध्यक्षपदी:जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रल्हाद पाटील ; जिल्हा कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखेतर्फे त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष भीमराज दाणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. सभेत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मानद अध्यक्षपदी बळीराम राठोड यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष-प्रल्हाद रिंढे पाटील (ग्रामविकास अधिकारी, गांधेली), जिल्हा सहसरचिटणीस- किशोर जाधव, महिला संघटक- कविता भुजाडे, प्रसिद्धिप्रमुख -श्रीकांत पाटील, कायदेशीर सहसल्लागार- अख्तर चांद पटेल, निमंत्रित सदस्य- गंगाधर गायकवाड यांची निवड करण्यात आली. या वेळी राज्य कायदे सल्लागार शिवाजी सोनवणे, कार्याध्यक्ष सुरेश काळवणे, सरचिटणीस प्रवीण नलावडे, कौन्सिलर राधा किसन चौधरी, पतसंस्था सचिव सागर डोईफोडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...