आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबुलाचा प्रसाद:केसरसिंगपुरा रेणुकामाता मंदिरात घटस्थापनेपासून तांबुलाचा प्रसाद

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसरसिंगपुऱ्यात श्री रेणुकामातेचे मंदिर असून घराप्रमाणे बांधकाम केलेले आहे. या ठिकाणी घटस्थापनेच्या दिवसांपासून तांबुलाचा प्रसाद वाटप केला जाणार असल्याचे पुजारी मुकुंद डोल्हारे यांनी सांगितले.

बाबा पेट्रोल पंप, जिल्हा न्यायालयाच्या मागील परिसरात हे उभारलेले आहे. सदरील मंदिर साधारणत: सतराव्या शतकातील असून या ठिकाणी पहिले केसरसिंग आणि कर्णसिंग दोन राजे होऊन गेले. त्यामुळे या परिसराला केसरसिंगपुरा म्हटले जाते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास कळसासारखा आकार दिलेला नाही. त्यामुळे दुरून एका घराच्या रचनेप्रमाणे दिसतो. पूर्वी दूरवरूनच मंदिरांचे कळस दिसल्यास मंदिरे उद््ध्वस्त केली जात होती. मात्र घराप्रमाणे बांधकाम असल्याने अनेक मंदिरे वाचली. श्री रेणुकामातेचे मंदिर तळघरात असून सोनईचे अण्णा महाराज यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना केली आहे.

मंदिराच्या परिसरात गणपती, विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, कालभैरव मंदिरे असून महादेवाचा नंदीसुद्धा गाभाऱ्यात आहे. नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता महापूजा, ११.३० वाजता मिलिंद डोल्हारे यांच्या हस्ते आरती करून भाविकांना तांबुलाचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. नऊ दिवस विविध संगीत कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...