आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करा:आ. बंब पुन्हा शिक्षक आणि शिक्षक आमदारांवर घसरले; म्हणाले - शिक्षकांचे नेतृत्व करणारे बोगस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद केले पाहिजे. अधिकारी दबावाला बळी पडून खोटे रिपोर्ट तयार करतात, त्यामुळे शिक्षकांवर कारवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आमदारकी चाटण्यासाठी नाही, मी शिक्षकांना तीन महिन्यात रुम बांधून देतो त्यांनी दर्जेदार शिक्षण द्यावे असा घणाघात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

शिक्षकांविरोधात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिक्षकांतर्फे औरंगाबादेतील आमखास मैदानात प्रशांत बंब यांच्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमदार बंब यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा शिक्षकांसह विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.

शिक्षकांचे नेतृत्व करणारे आमदार बोगस

प्रशांत बंब यांनी आमदार विक्रम काळे आणि मोर्चेकरी शिक्षकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोर्चातील शिक्षक आणि त्यांचे नैतृत्व करणारे आमदार बोगस आहेत. मतदार संघातील गोष्टी सुधारून दाखवा असे आव्हान मला दिले मी त्यांचे आव्हान स्विकारतो.

शिक्षकांचे बोलवते धनी माहित आहे

प्रशांत बंब म्हणाले, माझे कुणीही बोलविते धनी नाही. मी चांगल्या संस्कारात घडलो. ंमाझे वरिष्ठ मला चांगले संस्कार देतात. त्यामुळेच मी चांगला मुद्दा मांडला. याला राज्यातील पालकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. माझ्या मुद्द्यांवर मुद्दाम राजकीय टर्न दिला जात आहे, मला त्यात जायचे नाही. शिक्षकांचे बोलवते धनी कोण आहेत हे मला माहित आहे. नाशिकला पाणी कुणी पळवले हे माहित आहे.

तर..कुणाची हिंमत आहे

प्रशांत बंब म्हणाले, विरोधकांचा बोलावता धनी वेगळा आहे. आम्ही घटना बदलायला चाललो, भाजप मुंबई तोडायला निघाले अशा वल्गना ते करीत आहेत पण मी म्हणतो की, मुंबईकडे डोळे वटारुन करण्याची कुणाची हिंमत आहे. मला सांगा, घटना बदलणारा दुसऱ्या दिवशी जिवंत राहणार आहे का? काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर 92 टक्के देशात राज्य चालवले.

गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या

प्रशांत बंब म्हणाले, शिक्षकांना मुख्यालयी राहावेच लागेल. अन्यथा त्यांचे वेतन थांबले पाहिजे. विरोधी पक्षातील आमदार माझ्यावर टीका करीत आहेत, पण मी देतो 15 दिवसांत रूम बांधून शिक्षकांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यावं. मला आमदारकी चाटायची नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांनी खोटे रिपोर्ट दिले आहेत.

विरोधकांना जशास तसे उत्तर

प्रशांत बंब म्हणाले, जर प्रत्येक गावांत दहा बाय दहाची खोली शिक्षकांना दिली तर ते मुख्यालयी राहतील असे आमदार विक्रम काळे म्हणाले, मी म्हणतो होय..हे आव्हान मी स्वीकारतो. तीन महिण्याच्या आत या सर्व शिक्षकांना दहा बाय पंधराची खोली उपलब्ध करून देतो.

बातम्या आणखी आहेत...