आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतापनगर भाजीवाली बाई चौक ते डी मार्टकडे जाणाऱ्या प्रतापनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम स्मार्ट सिटीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यापासून काम पूर्णपणे रेंगाळलेले असल्याने या रस्त्याने जाणारे वाहनधारक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेले खड्डे व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नागरिकांना संध्याकाळी व रात्री छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या मध्ये असलेल्या ड्रेनेजलाइनची कामे करण्यात आली.
तसेच रस्त्याच्या मध्ये असलेले इलेक्ट्रिक खांबही हटवण्यात आले, परंतु रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याविषयी ‘दिव्य मराठी’ने बातमी प्रकाशित केली होती. तेव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कामाला गती देण्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात मात्र कामाला गती मात्र देण्यात आली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.