आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर:बँकेच्या लॉकरमधून तब्बल 31 लाख रूपयांचे दाग दागिने लांबविले, महिलेचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद नातेवाई महिलेच्या बँकेच्या लॉकरमधुन तब्बल 31 लाख रूपयांचे दाग दागिने तसेच विदेशी चलन असा सुमारे 31 लाख 97 हजारांचा मुद्देमाल लांबविल्याप्रकरणी दाखल गुन्‍ह्यात संशयीत नातेवाईक महिलेने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.डी. देव यांनी नामंजूर केला. फातेमा मोहम्मद गीरणीवाला (38, रा. सिटीचौक काली मस्जिद) असे संशयीत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणात दुरैय्या असगर गिरणीवाला (40, रा. बुऱ्हाणी कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, दुरैय्या गिरणीवाला यांचे पती हे 12 वर्षांपासून पश्चिम अफ्रिकेत नौकरीला आहेत. दुरैय्या गिरणीवाला व त्यांचे पती असगर गिरणीवाला यांचे कोटक महिंद्रा बँक, शाखा कंडी टॉवर जालना रोड येथे ज्वॉईंट अकाऊंट आहे. याशिवाय या ठिकाणी दुरैय्या गिरणीवाला यांचे लॉकरही आहे. या लॉकरमध्ये 20 लाख रूपयांचे दागदागिणे, दोन लाख रूपये कॅश तसेच विदेशी चलन असा एकूण 31 लाख 97 हजार रूपयांचे वस्तु होत्या. 15 फेब्रुवारी रोजी दुरैय्या गिरणीवाला या बँकेत आल्या होत्या. त्यांनी 1 लाख रूपये रोख रक्कम मन्सुर वाडीवाला यांना काढून दिले होते. त्यावेळी लॉकरमध्ये दागदागिने व्यवस्थीत होते. 22 एप्रिल रोजी दुरैय्या या रमजान सणासाठी बँकेतून दागिने काढण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब होती. या प्रकरणात मन्सुरवाडीवाला तसेच महिलेच्या चुलत जाऊ तथा संशयीत आरोपी फातेमा गीरणीवाला हिला बोलावून घेतले. त्यावेळी फातेमा हिने या दागिण्याबाबत तिच्या पतीला काही सांगू नका असे सांगितले होते. दुरैय्या बेगम यांना मायग्रेनचा त्रास असल्याने, त्यांच्यापतीने लॉकरची चावी व अन्य कागदपत्रे फातेमा कडे दयायला सांगितले होते.

दरम्यान, याबाबत दुरैय्या गिरणीवाला यांनी या चोरीबाबत 28 एप्रिल रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. ही प्रक्रिया सुरू असताना, बँकेचे मॅनेजर यांनी दुरैय्या यांना बोलावून घेतले. 5 एप्रिल 2022 आणि 13 एप्रिल 2022 रोजी चुलत जाऊ व त्यांच्यासोबत एका व्यक्ती आली होती. त्याने या बॅकेच्या लॉकरमधून दाग दागिने व पैसे नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखविले. या प्रकरणात दुरैय्या गिरणीवाला यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या 31 लाखांचे दागदागिणे व रोख रक्कम चोरी झाल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर हिरल शेख, लॉकरचे काम पाहणारी कर्मचारी महिला सायली घाडगे आणि विश्वास संपादन करून बँकेतून दागदागिने काढून नेणाऱ्या फातेमा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान गुन्‍ह्यात अटक होऊनये यासाठी संशयीत फातेमा हिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला.

बातम्या आणखी आहेत...