आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकंपनीत काम करणाऱ्या विवाहित महिलेने सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार ७ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणात आरोपी सुपरवायझर इस्माईल पठाण (रा. साजापूर, वडगाव कोल्हाटी) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. आगरकर यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्यासह अटी व शर्तींवर मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.
या प्रकरणात मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत विवाहिता रेमंड कन्झ्युमर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होती. कंपनीचा सुपरवायझर इस्माईल पठाण विवाहितेला त्रास देत होता. विवाहितेने पतीला सांगितले असता त्याने इस्माईलला समज दिली होती. तरीही इस्माईल तिला त्रास देत होता. याला कंटाळून विवाहितेने ७ जानेवारी रोजी घरात विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.