आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवळाई परिसरातील दीपक रामदास सोनवणे या अभियंत्याचे कथित धर्मांतर केल्या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेताना मुस्लिम मुलीशी प्रेमाचे संबंध निर्माण झाले. तिच्या घरच्यांनी आपले बळजबरी धर्मांतर केले अशी फिर्याद दीपकने दाखल केली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. याविरोधात चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
सत्र न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीन अर्जास सरकारी अभियोक्ता मधुकर आहेर पाटील यांनी विरोध केला. ते म्हणाले, ‘गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. बळजबरी धर्मांतर केले असून खतना करण्यात आली आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अनेक गोष्टी जप्त करायच्या आहेत. फिर्यादीस गुंगीचे औषध देऊन तो गुंगीत असताना त्याला सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयात नेऊन त्याची खतना करण्यात आली. आरोपींनी वेगवेगळे नऊ मोबाईल वापरून त्यात फिर्यादीचे शूटिंग केले आहे.’ सत्र न्यायालयाने शेख सना फरहीन शहामीर, शहामीर शमशोद्दीन शेख, शेख खाजा बेगम शेख शहामीर आणि शेख साझिया सदफ शेख शाहमीर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.