आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 ई-दुचाकी जप्त:जप्त ई-दुचाकींची आधी तपासणी; नंतर शोरूम, कंपनीवर गुन्हे दाखल करणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहनांत बेकायदा बदल करून विक्री करणाऱ्या शोरूमवर परिवहन विभागाचा बडगा

ताशी २५ किमी वेगाने धावणाऱ्या व २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या ई-दुचाकी ५५ किमीच्या स्पीडने डबलसीट धावत असल्याचे निदर्शनास येताच परिवहन विभागाने संबंधित ई-बाइक विक्री करणाऱ्या शोरूमवर कारवाई केली. बेकायदा बदल केल्याप्रकरणी १२ ई-दुचाकी जप्त केल्या. त्यापैकी ५ ई-दुचाकी आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. अहवालानंतर संबंधित शोरूम व कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांचे म्हणणे आहे. राज्यभरात बेकायदा बदल करणाऱ्या वाहन उत्पादक आणि वितरकांची तपासणी मोहीम परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत २३ व २४ मे रोजी १२ विक्रेते आणि रस्त्यावर धावणाऱ्या ३९ ई-दुचाकीची आरटीओ पथकाने तपासणी केली.

यात वैजापूर, कन्नड येथील दोन शोरूमवर जाऊन तपासणी केली तेव्हा १२ ई-दुचाकी ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या आढळून आल्या. यात ७ वाहने विक्रेत्यांकडे अडकवून ठेवण्यात आली, तर ५ वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात नेली.

काय आहे नियम? : ताशी २५ किमीपेक्षा कमी आणि त्या वाहनाची वॅट क्षमता २५० असावी असा नियम आहे. या ई-दुचाकींना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. काही वाहन उत्पादक मान्यता संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची विक्री करत आहेत, तर काहींकडून वाहनांत बेकायदा बदल केला जात आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढून दुर्घटना होण्याच्या घटना घडू शकतात.

२५% क्षमतेने धावल्या दुचाकी
परिवहन अधिकारी ई-बाइकची तपासणी करण्यासाठी वैजापूूर व कन्नड येथील शोरूममधील ई-बाइक्स चालवून पहिली असता त्या क्षमतेपेक्षा २५ टक्के अधिक वेगाने धावू लागल्या. त्या दुचाकी ताब्यात घेतल्या असून शोरूमला दुचाकी विक्री करण्यास मनाई केली.

ई-दुचाकींची तपासणी मोहीम सुरूच राहणार
ई-दुचाकींची तपासणी मोहीम सुरूच राहणार असून दोन शोरूममधून जप्त केलेल्या दुचाकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. लवकर परीक्षण अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. - संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...