आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Pre school Preparation Will Start In The First Week Of April 2 Lakh 61 Thousand 948 Children From 3237 Anganwads Will Be Admitted To The First Class In G.P. An Initiative Of The Department Of Education

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार शाळापूर्व तयारी:3237 अंगणवाड्यांमधील 2 लाख 61 हजार 948 बालकांचा पहिल्या वर्गात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळापूर्व तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील एकूण 3237 अंगणवाड्यातील 2 लाख 61 हजार 948 बालकांचे सर्वेक्षण करुन पात्र विद्यार्थ्यांना पहिल्याचा वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती जि.प.च्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात कोविडमुळे प्राथमिक शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचे पडसात अजूनही कायम असून, शैक्षणिक वर्ष संपत असले तरी देखील विद्यार्थ्यांची हवी तशी गुणवत्ता सुधार अजूनही आढळून आलेले नाहीत. तर विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपाय शिक्षण विभागाच्या वतीने आणि शाळेच्या स्तरावर देखील केले जात आहे. गेल्या वर्षीपासून बालशिक्षणावर अधिक भर देत पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचा प्रवेश होण्यापूर्वी वातावरण निर्मिती करणे, शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करणे अशी पूर्व तयारी जि.प.शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. यात पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल. ज्यात प्रामुख्याने 3237 अंगणवाड्यांमधील 2 लाख 61 हजार 948 बालकांमधून जे पहिल्याच्या वर्गासाठी पात्र असतील त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशानंतर माता-पालक मेळावा, माता मेळावा घेवून प्राथमिक शिक्षणाविषयीची जनजागृती केली जाणार आहे. शिक्षकांना वर्गानुसार आणि वयानुसार शिकवण्याच्या कृतीपद्धतीवर माहिती दिली जाणार आहे. तसेच 1 एप्रिल पासून पहिलीचा वर्ग सुरु करण्यात येईल. ज्यात खेळांचा समावेश असणार आहे.एप्रिल महिन्यातच प्रवेश करून या मुलांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.कृतीतून शिक्षण याद्वारे मुलांचा विकास केला जाईल.

शाळापूर्व तयारीची सुरुवात

प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाल्या की, पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या मुलांचे प्रवेश करुन घेण्याबरोबरच शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाळापूर्व तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...