आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 किमीची वेगमर्यादा लागू:विद्यापीठात प्री-वेडिंग शूट, पतंगबाजी, वाहन शिकणाऱ्यांना आता 3 हजारांचा दंड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात तुम्ही जर वाहन शिकण्यासाठी, पतंग उडवण्यासाठी, प्री-वेडिंग शूटसाठी अथवा नशापान करण्यासाठी जात असाल तर खबरदार..! तुम्हाला किमान दाेन ते तीन हजार रुपये दंड भरावा लागेल. विद्यापीठाने आदर्श संहिता जारी केली असून अंमलबजावणीसाठी सहासदस्यीय समिती गठित केली आहे. परवानगीशिवाय आंदोलने किंवा सकाळ-सायंकाळ वॉकिंगसाठी येणाऱ्यांचेही गैरवर्तन सहन केले जाणार नाही. जळीत प्रकरणानंतर पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या अपघातापासून विद्यापीठ प्रशासनाने धडा घेतला आहे.

विद्यापीठातील विद्यार्थी, अभ्यागत, प्राध्यापकांना कॅम्पसमध्ये वाहन चालवताना २० किमीपेक्षा कमी स्पीड ठेवावा लागेल. सायलेन्स झोन असल्याने वाहनांचे कर्कश आवाज, हॉर्न वाजवण्यास मनाई केली आहे. पूर्वपरवानगीशिवाय फोटोशूट, प्री-वेडिंग शूट तर अजिबात करता येणार नाही. असे कुणी करताना आढळले तर दोन हजारांचा दंड लागेल. जॉगिंग-वॉकिंग-ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांना गेटबाहेर वाहन पार्क करावे लागेल. पोलिस जसे गस्त घालतात अगदी तसेच आता विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक गस्त घालतील. याच रक्षकांना साप पकडण्याचे ट्रेनिंग दिले जाईल. त्यांना पाच स्नेक स्टिक देण्यात येणार आहेत.

कुलसचिव डॉ. साखळे ठेवतील नियंत्रण संहितेचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरूंनी कुलसिचव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. त्यात सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम देशमुख आणि सुरक्षा एजन्सीच्या एका प्रतिनिधींचा समावेश असेल.

मोर्चे, उपोषण, निदर्शनांसाठी हवी परवानगी ग्राउंडमध्ये पतंंग उडवण्यास बंदी असेल. प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच मोर्चा, धरणे, उपोषण, निदर्शने करता येतील. आंदोलनाच्या ठिकाणी कलम-१४४ लागू असेल. विद्यापीठ परिसरात पोस्टरबाजी, निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान राजकीय सभा, उद्घाटन, मेळावे घेता येणार नाहीत. सिंगल युज्ड प्लास्टिकवर बंदी असेल. सर्व प्रकारच्या स्थायी-अस्थायी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी, ओळखपत्र दिले जाईल. विपरीत घटना घडल्यास ९४२१६६४८३० या क्रमांकावर फोन करता येईल.

बातम्या आणखी आहेत...