आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात तुम्ही जर वाहन शिकण्यासाठी, पतंग उडवण्यासाठी, प्री व्हेडिंग शुटसाठी अथवा नशापान करण्यासाठी जात असाल तर खबरदार..! तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विद्यापीठाने आदर्श संहिता केली असून अंमलबजावणीसाठी सहा सदस्यीय समिती गठित केली आहे. परवानगीशिवाय आंदोलने किंवा सकाळ-सायंकाळ वॉकिंगसाठी येणाऱ्यांचेही गैरवर्तन सहन केले जाणार नाही.
ज्याप्रमाणे जळित प्रकरणानंतर पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक केली आहे. अगदी त्याच प्रमाणे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या झालेल्या अपघातापासून विद्यापीठ प्रशासनाने धडा घेतला आहे.
कुलसचिव डॉ. साखळे ठेवतील नियंत्रण
संहितेचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरूंनी कुलसिचव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. त्यात सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे (सचिव), कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, बहिशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरूषोत्तम देशमुख आणि सुरक्षा एजन्सीचे एका प्रतिनिधीला सदस्य करण्यात आले आहे.
आंदोलनांना चाप
ग्राऊंडमध्ये पतंंग उडवण्यास बंदी असेल. प्रशासनाची पुर्वपरवानगी घेऊनच मोर्चा, धरणे, उपोषण, निदर्शने करता येईल. आंदोलनांच्या ठिकाणी कलम-१४४ असेल. विद्यापीठ परिसरात पोस्टरबाजी, निवडणूकीच्या आचारसंहिते दरम्यान राजकीय सभा, उद्घाटन, मेळावे घेता येणार नाहीत. सिंगल युज्ड प्लास्टिक पूर्णपणे प्रतिबंधित असेल. सर्व प्रकारच्या स्थायी-अस्थायी कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी, ओळखपत्र दिले जाईल. विपरित घटना घडल्यास (९४२१६६४८३०) या क्रमांकावर फोन करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.