आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रेमचंद यांनी सामान्यांना साहित्याचा भाग बनवले ; नुरूल हसनैन यांचे मत

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसाव्या शतकात राजकारण, समाज, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रांत महान व्यक्तींचा जन्म झाला. या बड्या व्यक्तींमध्ये मुंशी प्रेमचंद यांचाही समावेश आहे. प्रेमचंद यांनी सामान्य माणसाला साहित्याचा भाग बनवले, असे प्रतिपादन उर्दूचे ज्येष्ठ साहित्यिक नुरूल हसनैन यांनी केले. ते विद्यापीठाच्या उर्दू विभाग व अंजुमन अहल कलमतर्फे ‘प्रेमचंद यांच्या काल्पनिक साहित्यातील सामाजिक समस्या’ विषयावर आयोजित चर्चासत्राप्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी उर्दू विभागप्रमुख डॉ. कीर्ती मालिनी जावळे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून नुरूल हसनैन, औरंगाबाद टाइम्सचे संपादक वजाहत कुरेशी, अंजुमन अहल कलमच्या अध्यक्षा फिरदोस फातिमा रमजानी खान आदींची उपस्थित होती. या वेळी वजाहत कुरेशी, नईमा अख्तर यांचा सत्कार करण्यात आला. शेख अजहर यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निशात नायरा यांनी परिचय करून दिला. शेहबाज जरीन, राणा तबस्सुम आदींनी विचार मांडले. जोहेब यार खान यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...