आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीआरएसकडून संघटना बांधणीला वेग‎:आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी, चांगल्या लोकप्रतिनिधींचा शोध सुरू‎

छत्रपती संभाजीनगर‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राष्ट्रीय समितीने‎ (बीआरएस) आता महाराष्ट्र‎ राज्यावर विशेष लक्ष केंद्रित केले‎ आहे. आगामी लोकसभा‎ निवडणुकीसाठी समितीच्या संघटना‎ बांधणीला वेग आला आहे.‎ सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी‎ प्राथमिक आढावा घेतला. प्रमुख‎ पदाधिकारी चांगल्या‎ लोकप्रतिनिधींचा शोध घेऊन‎ त्यांच्याशी थेट संवाद साधत असून‎ त्यांना पक्षात येण्यासाठी निमंत्रण‎ दिले जात आहे.‎ समितीचे प्रमुख तथा तेलंगणचे‎ मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काही‎ प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.‎ फोनवरून पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण‎ दिले जात आहे. सरचिटणीस हिमांशू‎ त्रिवेदी यांनी नुकतेच शहरात येऊन‎ गेले. त्यानंतर दोन दिवसांनी रविवारी‎ संत एकनाथ नाट्यगृहात संघटना‎ बांधणीसाठी बैठक पार पाडली.‎ बैठकीत काही प्रवेश झाले आहेत.‎ आपच्या नेत्यांचा ओढा :‎ बीआरएसमध्ये प्रवेश करण्याकडे‎ आम आदमी पक्षातील (आप) नेते,‎ पदाधिकाऱ्यांचा ओढा असल्याचे‎ चित्र आहे. ‘आप’च्या‎ पदाधिकाऱ्यांना प्रचार व प्रसारासाठी‎ पैशांची निकड असते. मात्र, त्यांना‎ फंड उपलब्ध करून दिला जात‎ नाही. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च‎ करणे पदाधिकाऱ्यांना परवडत नाही.‎ दुसरे म्हणजे वरिष्ठ पदाधिकारी‎ संघटना बांधणीसाठी प्रयत्न करत‎ नाहीत. जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील‎ यांच्यासह अनेकांनी पदाचा‎ राजीनामा दिला आहे. याचबरोबर‎ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीही‎ बीआरएसच्या गळाला लागले ‎.‎ ‎ दोन लाखांचे विमा संरक्षण :‎ तेलंगणमध्ये बीआरएसने सक्रिय‎ कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा‎ विमा उतरवून त्यांना दोन लाख‎ रुपयांचे संरक्षण कवच दिले आहे.‎ अशा प्रकारे विमा कवच देणारा हा‎ पहिला पक्ष असल्याचा दावा‎ सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी‎ ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.‎

बातम्या आणखी आहेत...