आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी:पहिल्या दिवशी शिक्षक-कर्मचाऱ्यांनी केली तयारी, बुधवारपासून येणार विद्यार्थी ; मगच विद्यार्थ्यांना प्रवेश

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शाळा सोमवारी (१३ जून) उघडल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसह सुरू होतो, परंतु कोरोनामुळे विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता पहिल्या दिवशी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीच उपस्थित होते. दिवसभर शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग दिसून आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी चौथ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाचा दुसरा टप्पा करण्याबरोबरच शाळांनी १५ जूनपासून येणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, पालकांची भेट घेऊन समुपदेशन करावे तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी शहरातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी मोठ्या शाळांमध्ये चाैकशी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यातही शिक्षक गुंतले होते. आता १५ जून रोजी सर्व विद्यार्थी शाळेत येणार असून त्यांना पहिल्याच दिवशी गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. प्रवेशोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पुस्तकांची पाहणी करून नीटनेटकी मांडणी करताना शिक्षिका व कर्मचारी वृंद.

बातम्या आणखी आहेत...