आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात पतीच्या निधनानंतर विधवा भगिनींना मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसह सुरक्षित आणि सक्षम आयुष्य जगण्याच्या संधी सुलभतेने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महसूल आणि इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी रविवारी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी घेतलेल्या बैठकीत त्यांनी या सुचना दिल्या आहेत.
या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, महसुल उपायुक्त पराग सोमण प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त जगदीश मणीयार, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, आमदार अंबादास दानवे, यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. डॉ. गो-हे यांनी महिला व बाल विकासाच्या, कृषी, कामगार, परिवहन, महसूल विभागाच्या विविध योजना अंमलबजावणीचा आढावा घेतला.
महिलासाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा
यावेळी गो-हे यांनी विधवा तसेच एकल महिलांना रोजगाराच्या संधी सुलभतेने प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने आणि एकंदरीतच त्यांच्या सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक संधी,सुविधा विनासायास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एकत्रित असा मदत आराखडा तयार करावा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा,नगरपालिका यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यामध्ये सहभागी करुन घेत विधवा महिलांना सहाय्यक ठरणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे गोऱ्हे यांनी सूचित केले. सुशिक्षित महिलांना रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे, शेतीमधील महिलांपर्यंत कृषी विभागाने त्यांच्या योजना व्यापक प्रमाणात पोहचवाव्यात.
विविध महामंडळांनी त्यांच्याकडील निधीतील काही भाग कोवीडमुळे वैधव्य आलेल्या महिलांच्या आर्थिक मदतीसाठी देणार असल्याचे सांगितले होते, त्याचा पाठपुरावा करावा. महिला व बाल विकास,समाज कल्याण,कृषी,शिक्षण,रोजगार, पशुसंवर्धन विभाग,विविध महामंडळे या सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांबाबत सहकार्याची भूमिका ठेऊन त्यांना योजनेचा लाभ विनाविलंब मिळवून द्यावा,असे डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.