आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलीला महोत्सवाची सांगता:इस्कॉनतर्फे राम-रावण युद्ध, भरत मिलापचे सादरीकरण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावण दहनाने इस्कॉन-व्हीईसीसी रामलीला महोत्सवाची सांगता बुधवारी झाली. या वेळी ३० हजार फटाके लावून तयार करण्यात आलेल्या ३० फुटी रावणाचे दहन करण्यात आले.वरूड काझी फाट्याजवळ ९ दिवसांपासून रामलीला महोत्सव सुरू होते. विजयादशमीनिमित्त गोपाल अग्रवाल यांच्या कुटुंबाने रावणाचे दहन केले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून राहुल धूत, सीपी त्रिपाठीसह मान्यवरांची उपस्थिती होती. त्यापूर्वी कुंभकर्ण वध, राम-रावण युद्ध लीला प्रस्तुत झाल्या. या वेळी भरत मिलाप आणि राम राज्याभिषेक सोहळाही पार पडला. रामलीलानिमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यानंतर हनुमान चालिसा पाठ व आरती करण्यात आली. शेवटी शेकडो भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. इस्कॉन औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. रोहिणीप्रिय प्रभूंच्या मार्गदर्शनात सामाजिक समरसतेचा महोत्सव ठरला असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...