आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीपीटी सादर:‘एनआयआरएफ’साठी प्राध्यापकांचे कुलगुरूंसमोर रिसर्चचे प्रेझेंटेशन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ वधारण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यूजीसीच्या निर्देशानुसार ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ची त्यांनी स्थापना केली. सेलमार्फत विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रस्ताव मागवले होते. प्राप्त ५७ पैकी ५५ प्रकल्पांचे ५ आणि ६ डिसेंबरला प्रेझेंटेशन घेतले. यात निवड झालेल्या संशोधन प्रकल्पांना २ ते ५ लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत.

एनआयआरएफ म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’ विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांसाठी असते. २०२१ दरम्यान ‘एनआयआरएफ’चे रँकिंग ७६ होते. यात २०२२ मध्ये ५ अंकांची घसरण झाली होती. मात्र, २०२३ मध्ये सुधारणा व्हावी म्हणून डॉ. येवले यांनी ‘रिसर्च डेव्हलपमेंट सेल’ची स्थापना केली आहे. त्याचे संचालकपद विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांना दिले. या कक्षामार्फत संशोधन प्रकल्पांना लाखोंचा निधी दिला जाईल. हा खर्च विद्यापीठ फंडातून केला जाईल. १० नोव्हेंबरपर्यंत प्राध्यापकांनी ५७ प्रस्ताव दिले होते. छाननीत २ बाद करून ५५ प्रकल्पांची डॉ. वायकर यांनी शिफारस केली. सर्व प्रकल्प प्राध्यापकांचेच आहेत.

सर्वाधिक विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २८ जणांनी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प्रेझेंटेशन केले. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ११, तर मानव्य विद्याशाखेच्या १६ प्रस्तावांचे प्रेझेंटेशन ६ डिसेंबरला सायंकाळी सहापर्यंत सुरू होते. ६ कॅटेगिरीत प्रत्येक ५ असे एकूण ३० गुणांचे प्रेझेंटेशन झाले. निवड झालेल्यांना टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. वाणिज्य आणि मानव्य विद्याशाखांना २ लाख, तर विज्ञानच्या प्रकल्पांना ३ लाख दिले जातील. खूपच आऊटस्टँडिंग असेल तर ५ लाख दिले जातील, असे कुलगुरूंनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

अकरा जणांची तज्ज्ञ समिती करणार निवड कुलगुरूंच्या अध्यक्षेखाली दहा सदस्यांची निवड समिती गठित केली आहे. त्यात चारही अधिष्ठातांचा समावेश आहे. डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. एन. एन. बंदेला, डॉ. सचिन देशमुख, डॉ. भारती गवळी, डॉ. बी. जी. गायकवाड, डॉ. सुनील नरवडे समितीत आहेत. -डॉ. भालचंद्र वायकर, संचालक, रिसर्च डेव्हलपमेंट सेल

बातम्या आणखी आहेत...