आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी रंगभूमी दिन:एमजीएममध्ये ‘समथिंग मिसिंग’ एकांकिकेचे सादरीकरण ; कुलगुरू डॉ. सपकाळ होते उपस्थित

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी रंगभूमी दिनानिमित्त एमजीएम विद्यापीठात रंगपूजन आणि ‘समथिंग मिसिंग’ या एकांकिकेचे शनिवारी सादरीकरण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी यशवंत देशमुख, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधा कदम, ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप घारे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर उपस्थित होते.

एमजीएम नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘समथिंग मिसिंग’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यात एमजीएम फिल्म आर्ट््सचा विद्यार्थी निशांत पवार, पत्रकारिता महाविद्यालयाची विद्यार्थिनी अदिती खडकीकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी भुमिका केल्या. दिग्दर्शन सोनवणे, तर लेखन संदीप दंडवते यांचे होते. तंत्रसाहाय्य संतोष गारोळे, विनोद पवार यांनी केले. राहुल खरे यांनी आभार मानले.

सक्षम नागरिक घडवणे हाच ध्यास : कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, नाट्य हे एक जसे शास्त्र आहे तसेच विद्यापीठही विविध ज्ञान शाखांची निर्मिती करणारी एक प्रयोगशाळा असते. येथून दर्जेदार मनुष्यबळ निर्मिती करून सक्षम नागरिक घडवणे हा आमचा ध्यास असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात कुलपती कदम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...