आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या राजकारणात इतकी कटुत निर्माण केली जात आहे की माणूसकी देखील शल्लक राहू नये. विरोधकांना कायम बदवाता ठेवण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत असून, सीबीआय, ईडी या संस्थांच्या यंत्रणेचा वापर करून दबाव आणत आहे. पण आम्ही देखील आमचा सुसंस्कृतपणा जपला आहे. त्यांच्या प्रत्येक कटुतेच्या वर्तनाचे आम्ही स्वागत केले असून, हा देश लोकशाही असलेला आहे. आम्ही लढू लढत राहू असे स्पष्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खा. सुळे या तीन दिवसांच्या औरंगाबाद दौरऱ्यावर आल्या आहेत. सोमवारी औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक मराठी पत्रकार संघ संघाच्या नूतनीकरण झालेल्या कार्याच्याचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर झालेल्या पत्रकारांच्या मीट द प्रेस मध्ये त्या बोलत होत्या. याप्रसंगी पदवीधरचे आमदार सतिश चव्हाण, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण औरंगाबादचे सचिव निलेश राऊत, सुरजितसिंग खुंगर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे, सचिव विकास राऊत यांची उपस्थिती होती.
सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात यापुर्वी सीबीआय, ईडीचा गैरवापर झाला नाही, मात्र गेल्या काही वर्षांत या यंत्रणेचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत आहे, विरोधकांना दबावात ठवणे हा त्या मागचा उद्देश आहे. आमच्या पवार कुटुंबालाही प्रथमच टार्गेट केले होते. यंत्रणा काम करते, त्यांच्या पध्दतीने त्यांना काम करून दिले पाहिजे. मात्र सध्याचे केंâद्र सरकार विरोधकांवर तबाव टाकण्यासाठी या यंत्रणेचा गैरवापर करीत अशी टीकाही सुळे यांनी केली. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आम्ही कमी बोलतो. त्या संस्कारामुळे आम्ही यंत्रणेचा आदर करतो, काही गैर घडत असेल तर त्याची जरूर चौकशी करावी, मात्र वारंवार चौकशीचे निमीत्त करून विरोधकांवर धाडी टाकणे, चौकशी करणे हे लोकशाहीत योग्य नाही, यावेळी अनिल देशमुख यांचे उदाहरण देत त्यांच्या घरावर धाडी टाकल्या पाच ते सात वेळा चौकशी झाली पण काहीच निष्पन्न झालेले नाही. आम्ही लढत राहू असेही सुळे म्हणाल्या.
वर्तमानपत्रांनी विरोधात लिहून नये म्हणूनच धाड
दरम्यान केंद्र सरकार हे केवळ विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांवरच नाही. जे वर्तमानत्र, संंपादक, पत्रकार त्यांच्या विरोधात लिहितायेत बोलतायेत त्यांच्या कार्यालयावर आणि घरांवर संस्थांच्या माध्यमातून धाडी टाकून करावी करत आहे. हे लोकशाहीतील पत्रकारिते मोठ वेगळ वातावरण दबावतंत्राच्या माध्यमातून केले जात आहे. पत्रकारिता हे संस्कार आणि विचार देण्याचे एक माध्यम आहे, या क्षेत्रातही बदल घडत आहे, नव-नवीन तंत्रज्ञान येत आहेत, त्यामुळे स्पर्धा वाढली आहे, स्पर्धा करताना ती निकोप असली पाहिजे, असे असताना सध्या ‘ब्रेकींग न्यूज’ च्या माध्यमातून कटूता वाढत आहे. सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य असू द्या, आमच्या सरकारला गंभीर प्रश्न विचारा जरूर विचारा. पण कटूता वाढविणे अयोग्य आहे, असे प्रकार टाळण्यासाठी पत्रकारांनी देखील आत्मपरिक्षण करावे, चांगले लिखान झाले तर सर्वजण वाचतात. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहन खा. सुळे यांनी केले आहे.
दरम्यान वाढते बालविवाह या विषयावर प्रश्न विचारला असता. कोविडमुळे मृत्यू झालेल्या ४५० मुलांना जीवलग अभियानाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यांचे शिक्षण सुरु रहावे, शासकीय मदत मिळावी, बालविवाह रोखण्यात यावेत यासाठी काम केले जात आहे. कोरोनामुळे पतीचे निधन होवून विधवा झालेल्या १६००० एकल महिलांसाठीही उपक्रम राबविण्यात येत आहेत. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यावर चर्चाही झाली आहे. लवकर महाराष्ट्र आघाडी सरकार हे महिलांसाठी आर्थिक साक्षरता हा उपक्रम सुरु करत आहे. यात येत्या दोन वर्षात महिलांना बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबत साक्षर केले जाणार आहे. असेही सुळे म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.