आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजिंठ्याच्या शेख आयेशा शेख रफिक यांना ७ सप्टेंबर २०१९ रोजी उज्ज्वला कनेक्शन याेजनेंतर्गत आठ कोटीवे गॅस कनेक्शन देण्यात अाले हाेते. मात्र, आजमितीस सबसिडी नगण्य व सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने अायेशा यांच्यावर पुन्हा धुराचा सामना करत स्वयंपाकासाठी चूल पेटवण्याची वेळ आली आहे. त्या वेळी गॅस मोफत अन् तोही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळाल्याने आयेशा शेख यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पहिले रिफिल सिलिंडर संपल्यावर फ्री मिळाले. नंतर त्यांच्याकडून चार्जेस घेतले गेले.
आता चक्क गॅसचा भाव ८३२ वर गेल्याने हात मजुरी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेख आयेशा यांना गॅस रिफिल भरून घेण्यासाठी पैसे नसल्याने त्या पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. धुरामुळे अाराेग्यावर परिणाम हाेत असल्याने धुरमुक्त ग्राम याेजनेचा फज्जा उडाला अाहे. उज्वल गॅस योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात अाले. मात्र,आता गॅस टाकीचा भाव आठशेच्यावर गेल्याने गरिबांना ते घेणे परवडत नसल्याने परत ते चुलीवर आले आहेत. गॅसचे भाव कमी करावे किंवा सबसिडी वाढवावी अशी मागणी हाेत अाहे.
सबसिडी फक्त ३ रुपये २६ पैसे; सिलिंडरची किंमत ~८३२
सबसिडी ३ रुपये... गॅस सिलेंडरची दरवड दर महिन्यांनी वाढत आहेत. आता गॅस सिलेंडर जवळपास ८३२ पर्यंत गेला. मात्र सबसिडी फक्त ३ रुपये २६ पैसेच येत आहेत. किमान देशाच्या सर्वच्च पदावरी व्यक्तीच्या हस्ते दिलेल्या योजनेचा लाभ व त्याच लाभार्थीचे होणारे हाल हा विरोधभास असून केंद्रातून अशा प्रकरणाकडे लक्ष द्यावे.
राज्यसभेत खा. सुप्रिया सुळेंनी उचलला मुद्दा...
अजिंठ्यातील शेख आयेशाचा यांचा गॅस महागाईमुळे पुन्हा चुलीकडे वळाल्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेत मांडला. यात आयेशा राहते ६०० रुपयांच्या भाड्याच्या खोलीत त्यापेक्षा ही गॅस ८०० रुपयावर पाेहचला. आयेशा यांनी ६०० रुपये घरभाडे भरावे की ८०० रुपयांची गॅसची टाकी घ्यावी अशी अनेक गरीब कुटुंबे असून त्यांना आता सबसिडी विना महागाचा गॅस परवडत नाही. हा मुद्दा मांडला.
घरभाडे ६००, गॅस सिलिंडर ८३२ घ्यावे काय?
मी भाड्याच्या घरात राहते. घराचे भाडे ६०० रुपये महिना त्यातच गॅस टाकीचे भाव ८३२ वर असल्याने आम्ही हात मजूर वाले असल्याने एवढा महाग गॅस वापरणे परवडत नाहीत. फ्री मध्ये गॅस उज्वला योजनेअंतर्गत तेही पंतप्रधान नरेंद मोदीजीच्या हस्ते औरंगाबाद येथे अाठ करोड वा गॅस कनेक्शन मिळालेला हाेता. आम्हाला निदान मोफत गॅस टाकी तरी द्यावी. -शेख आयेशा, अजिंठा, लाभार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.