आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागसेनवन येथील मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांना नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मलेशिया येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ व डॉ. आंबेडकर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनामध्ये प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रधान ‘आंबेडकरवादाशिवाय जगातील स्त्रियांचे उत्थान नाही’ या विषयावर मार्गदर्शनही करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.