आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:4 दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार औरंगाबादेत खासगी शाळा, कोचिंग क्लासेस सुरू; कोरोनाची काळजी घेत सुरू केल्याचा दावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची काळजी घेऊन सॅनिटायझर, शारीरिक अंतर राखत तीन तासांचे वर्ग घेतल्याचे काही शिक्षण संस्थांकडून सांगण्यात आले.

कोरोनाची लाट ओसरत असून सरकारकडूनही सर्वच क्षेत्रे खुली झालेली असली तरी शहरातील शाळांमधून ज्ञानार्जनाचा आरंभ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारला वेळोवेळी निवेदने देऊनही शाळा, कोचिंग क्लासेसबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून चार दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार २३ ऑगस्टपासून औरंगाबाद शहरातील खासगी शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील कोरोनाची काळजी घेऊन सॅनिटायझर, शारीरिक अंतर राखत तीन तासांचे वर्ग घेतल्याचे काही शिक्षण संस्थांकडून सांगण्यात आले.

विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार हरिभाऊ बागडे यांनी २० ऑगस्ट रोजी एक पत्रकार बैठक घेऊन येत्या सोमवार दि. २३ ऑगस्ट पासून गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीसाठी तीन तासांची शाळा सुरू करणे आवश्यक असून सरकारकडून परवानगी मिळाली नाही तर शाळा सुरू करू, असा इशारा दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा सुरू करण्यात आल्या.

भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून शाळा, खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोचिंग क्लासेस व दहावीचे बहुतांश खासगी शाळांमधील वर्ग आजपासून सुरू केलेले आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत असून काही मुले कायमचे शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी औरंगाबादसह महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेस, बहुंताश खासगी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

भाजप शिक्षण संस्थाचालक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजीव विनायकराव वाघ, शहराध्यक्ष प्रा. मुजीब मुल्तानी यांनीही शाळा सुरू केल्याचा दावा केला आहे. तर धर्मवीर संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण बाभुळगावकर यांनी सांगितले की, पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले. मात्र, ज्यांच्याकडे मोबाईलसारखी ऑनलाईन शिक्षणासाठीची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी एका वर्गात ८ ते १० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...