आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:येत्या वर्षात चिकलठाणा विमानतळाचे खासगीकरण; रायपूरशी जोडले जाणार!

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विमान प्राधिकरण (एएआय) येत्या वर्षात ७ मोठ्या, ६ लहान विमानतळांचे खासगीकरण करत आहे. यामध्ये चिकलठाणा विमानतळाचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विमानतळांचे खासगीकरण सुरू आहे. २०२१-२२ मध्ये अमृतसर, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर, त्रिची, वाराणसी, औरंगाबाद, हुबळी, तिरुपती, जबलपूर, कांग्रा, खुशीनगर व गया विमानतळांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारला त्यातून २०२४ पर्यंत ३ हजार ७०० कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. खासगीकरण होणाऱ्या १३ विमानतळांत एका सर्कलचे विमानतळ एकत्र ठेवले जातील. वाराणसी विमानतळ खुशीनगर, गयासोबत जोडले जातील. अमृतसर व कांग्रा, भुवनेश्वर आणि तिरुपती, रायपूर आणि औरंगाबाद, इंदूर आणि जबलपूर, त्रिची आणि हुबळी विमानतळ प्रशासकीयदृष्ट्या जोडले जातील.

खासगीकरणाची निविदा प्रक्रिया पुढील वर्षी पूर्ण होईल. पर्यटकांची गर्दी असलेले वाराणसी, खुशीनगर व गया गुंतवणूकदारांच्या सर्वाधिक पसंतीचे असतील, अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की, खासगीकरणात प्रथमच छोट्या विमानतळांचा समावेश करण्यात आला असून गुंतवणूकदारांनी विमानतळाचा विकास, विस्तारीकरण करावे. मात्र, अंतिम मालकी सरकारची राहील, अशी अट असेल. सध्या हैदराबाद, बंगळुरू, मंगलुरू, दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनऊ विमानतळ खासगीकरणातून चालवले जात आहेत. अदानी ग्रुप जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम, नवी मुंबई विमानतळ लवकरच विकसित करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...