आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. शिंदे खून प्रकरणाचा तपास अखेर संपला...:अल्पवयीन आरोपी ताब्यात...खुनासाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू विहिरीतून जप्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येचे आठ दिवसानंतर रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. मारेकऱ्याने शिंदेंच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, चाकू, कटर आणि रक्ताने माखलेला टाॅवेल जवळच्या विहिरीतून जप्त केले आहेत. शनिवारपासून या विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सर्व शस्त्र सापडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

निकटवर्तीयाच्या मनात शिंदेंबद्दल प्रचंड द्वेष
प्रा. राजन शिंदे हे त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकाचा नेहमीच ‘ढ’ म्हणून पाणउतारा करायचे. वारंवार हाेत असलेला हा अपमान सहन न झाल्याने संबंधित निकटवर्तीयाच्या मनात शिंदेंबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला हाेता. यातून त्यांच्यात फारसे संभाषणही हाेत नव्हते. १० ऑक्टाेबर राेजी रात्रीही या दाेघांमध्ये असाच टाेकाचा वाद झाला हाेता. रात्री दीड वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. मध्यरात्री शिंदे बैठक खोलीत झोपी गेले. हीच संधी साधून निकटवर्तीयाने त्यांची हत्या केल्याचा संशय होता. सुरुवातीला प्राथमिक तपास करतानाच पाेलिस या निष्कर्षापर्यंत पाेहाेचले हाेते, मात्र त्यांच्या हाती पुरावे नव्हते. तसेच चाैकशीतही निकटवर्तीयांकडून मागमूस लागू दिला जात नव्हता. मग पाेलिसांनी तांत्रिक व भावनिक तपास सुरू केला. निकटवर्तीयांची स्वतंत्रपणे चाैकशी केली, त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली तेव्हा संशय पक्का झाला. दाेन दिवसांपूर्वीच पाेलिस मारेकऱ्याला ओळखण्यात यशस्वी झाले, पण पुरावे हाती नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यास पाेलिसांनी वेळ घेतल्याचे सांगितले जाते.

हत्येनंतर मारेकरी साेशल मीडियावर सक्रिय
प्रा. शिंदे यांची हत्या पहाटे तीनच्या सुमारास झाली. हत्येनंतर मारेकरी सोशल मीडियावर सक्रिय होता, अशी माहिती तांत्रिक तपासात समोर येत आहे. गाढ झोपेतील शिंदेंच्या डोक्यात मारेकऱ्याने डंबेल्स मारले. त्यातच शिंदे हे गतप्राण झाले. पण जिवंत असल्याची भीती वाटल्यामुळे मारेकऱ्याने चाकू, कटरने गळ्यासह त्यांच्या हातांच्या नसा, कान कापला. हत्येनंतर आसपासचे रक्त व आपल्या अंगावरील रक्त आराेपीने टॉवेलने पुसले होते. डंबेल्स, रक्ताने माखलेला चाकू आणि कटर टॉवेलसह विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...