आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:आरोपीस ताब्यात घेतल्यामुळे परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षकास मारहाण, सेनगाव पोलिसांत 150 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील कवरदरी येथे शेतीच्या वादातून एका आरोपीस ताब्यात घेतल्याच्या कारणावरून एकत्र आलेल्या जमावाने परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात १५० जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोमवारी ता. ३० पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कवरदरी येथे लक्ष्मण कुंदर्गे व रंगराव कुंदर्गे यांच्यात शेतीचा वाद सुरु झाला होता. या प्रकरणात रविवारी ता. २९ घटनास्थळावर मोठा वाद होण्याची चिन्हे लक्षात घेऊन कैलास कुंदर्गे यांनी या घटनेची माहिती सेनगाव पोलिस ठाण्याला दिली. सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. सी. लोकडे, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक अभय माकणे हे काही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. त्यानंतर पोलिसांनी वाद घालणारी व्यक्ती बाळु उर्फ किशन कुंदर्गे यास ताब्यात घेतले. त्यावरून तेथे मोठा जमाव एकत्र आला.

यावेळी जमावातील काही जणांनी उपनिरीक्षक अभय माकणे यांना तसेच काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच धमकी दिली. या प्रकरणी आज पहाटे उपनिरीक्षक माकणे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात रंगराव कुंदर्गे, गजानन कुंदर्गे, विष्णू कुंदर्गे, तुकाराम कुंदर्गे, राजू कुंदर्गे, अरुण कुंदर्गे, प्रकाश कुंदर्गे, पंडीत कुंदर्गे, भगवान कुंदर्गे, नामदेव कुंदर्गे, आदित्य कुंदर्गे, आनंदा कुंदर्गे, बाळु कुंदर्गे, दशरथ कुंदर्गे, गजानन कुंदर्गे, उमेश कुंदर्गे,नितन कुंगर्दे, संतोष कुलगर यांच्यासह १५० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना बाळु कुंदर्गे, गजानन कुंदर्गे, उमेश कुंदर्गे यांना अटक केली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. की. लोकडे, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी भेट दिली आहे. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser