आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणासह सर्वच मागण्यांकडे सरकाराचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. त्यामध्ये कोपर्डीतील नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा यासह विविध मागण्यांचा समावेश असून तातडीने सर्व मागण्याचा विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्के आरक्षण लागू करावे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतमालास हमी भाव मिळावा, त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी कायदा करावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करावे, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करा, इतर मागास प्रवर्ग, मराठा, खुल्ला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मधील अन्याय दूर करावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरु करावे. जाचक अटी रद्द कराव्यात.
सारथी संस्थेला भरघोस निधी द्यावा. गोरगरीब मराठा मुला मुलींना केजी टू पीजीचे शिक्षण या माध्यमातून मोफत मिळावे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे काम त्वरीत सुरु करावे. गडकिल्ल्यांचे संवर्धनकडे विशेष लक्ष द्यावे, विकासासाठी विशेष निधीची तरतूद करावी, राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करावे, प्रत्येक जिल्ह्यांत मराठा भवन उभारणीसाठी जागा मिळावी, जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी 500 विद्यार्थी क्षमतेचे वस्तीगृह बांधावे, 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सेवा सवलती लागू करावे, महाराष्ट्र कर्नाटक सिमा वाद सोडवण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, मराठा इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे, चुकीचे, बदनामकारक लिखाण करणाऱ्यांवर कठोर करावाईसाठी कायदा करावा, आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, समांतर आरक्षण मधील अन्यायग्रस्त महिला व खेळाडूना न्याय द्यावा, या मागण्यांकडे महाविकास आघाडी सरकारने तातडीने लक्ष देऊन सर्व मागण्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्य समन्वयक विजय काकडे पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, रेखा वाहटुळे, वकील. सुवर्ण मोहिते आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.