आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विसर्जन मिरवणुकीत नाचताना तासाला 700 कॅलरीज बर्न होतात; ऊर्जेसाठी ग्लुकोज, लिंबूपाणी व फळे खावी

विजय साठे | औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसर्जनाची मिरवणूक किमान ४-५ तास चालते. यात चालणाऱ्यांच्या ताशी २००, तर नाचणाऱ्यांच्या ७०० कॅलरीज खर्च होतात. शरीरात पेशीत चालणारी मुख्य ऊर्जा प्रक्रिया म्हणजे ग्लुकोज आहे. लवकर थकवा येऊ नये आणि शरीरातील ऊर्जा कायम राखण्यासाठी, ग्लुकोज सोडियम व पोटॅशियम असलेल्या पदार्थाचे प्रत्येक तासाला सेवन करणे गरजेचे असल्याचा सल्ला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू डॉ. विकास देशमुख यांनी दिला.

ते म्हणाले, सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती एक तास चालत राहिली तर २०० ते ३०० कॅलरीज खर्च होतात. विसर्जन मिरवणुकीचा विचार केल्यास काही जण एकाच जागी तासन् तास उभे असतात. किंवा काही जण नाचणे वा ढोल वाजवत असतात. त्यामुळे त्यांच्या तासाला किमान ४५० ते ७०० कॅलरीज बर्न होतात. सलग ४ ते ५ तास अशीच क्रिया सुरू असल्यास मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होवून शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होवू शकते.

गणरायाला निरोप देताना विसर्जनाच्या मिरवणुकीत अशी राखा तुमची उर्जा...

दिव्य मराठी एक्स्पर्ट - डॉ. विकास देशमुख
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू

केळी खावी : लोह व पोटॅशियमने समृद्ध केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्हाला शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवत असेल तर केळी खावी.
लिंबू पाणी : मिठ टाकून बनलेल्या लिंबू पाण्याने त्वरीत ऊर्जा मिळते. मिठ टाकलेले असल्याने शरीराला सोडियमचा पुरवठा होतो.
बिस्किट : बिस्किट स्वतःचा कमी उष्मांक असतो. अनेक बिस्किटे कमी फॅटची असतात, ती ऊर्जा देतात. पोट भरून जेवण्याची गरज राहत नाही. त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास वेळ मिळतो.

चिक्की : गुळ व शेंगदाण्यापासून तयार केलेली चिक्की हा ऊर्जेचा उत्तम पर्याय आहे. चिक्की सहज खिश्यातही बाळगता येते. शरीराला ऊर्जा देणारे ग्लुकोज पुरवण्याचे काम चिक्की करते.
काजू : काजू हा ऊर्जा देणारा पदार्थ आहे. मूठभर काजू प्रथिने, बायोएक्टिव्ह संयुगे आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. ते तुमचा स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.
सफरचंद : सफरचंदांमध्ये ऊर्जा देणारी कॅलरी, कर्बोदके, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते खाल्याने जळजळ कमी करू शकते आणि शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवू शकते.

बातम्या आणखी आहेत...