आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली दोन वर्षे कोरोनामुळे महेश नवमी डिजिटल स्वरूपात साजरी झाली. यंदा ती विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार असून शोभायात्रेत सामाजिक देखाव्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष संतोष लड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेश नवमीनिमित्ताने २ जूनपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लड्डा म्हणाले की, २ जूनला चार दांपत्ये खडकेश्वर येथील महादेव मंदिरात रुद्राभिषेक करतील. सत्यम शिवम सुंदरम एकल नृत्य स्पर्धा होईल. ३ रोजी सायकल रिले स्पर्धा, क्विझ ऑन रामायणा, चित्रकला, फिल्मी अंताक्षरी, बॉक्स क्रिकेट होईल. ४ रोजी फोटो हंट, बॅडमिंटन, झांकी के साथ भजन तसेच ५ जून रोजी मॅरेथॉन, स्विमिंग, चेस आणि कॅरम, हस्ताक्षर, कोन बनेगी मनकर्णिका, होम मिनिस्टर, ६ जून रोजी मातृ-पितृ पूजन, आदर्श माँ-बेटी, ७ जून रोजी वारली पेंटिंग, सूरसंगम भजन अंताक्षरी, राजधानी धरोहर होणार आहे. ८ जून रोजी तापडिया नाट्यमंदिरात पारितोषिक वितरण होईल.
वाहन रॅली, मिरवणूक : ९ तारखेला सकाळी रेणुका माता मंदिरापासून ते खडकेश्वर मंदिरापर्यंत दुचाकी, चारचाकी रॅली काढली जाईल. यात ईव्ही असतील. दुचाकीस्वारांना हेल्मेट असणे बंधनकारक असून हॉर्न वाजवला जाणार नाही. सायंकाळी ४ वाजता खडकेश्वर येथून मिरवणूक निघेल. या वेळी रक्तदान शिबिरही होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत वैभव मंडोरा, मनोज तोतला, बजरंग नावंदर, एम. बी. जाजू, सी. एस. सोनी, मुकुंद गट्टाणी, राजीव मणियार, जगदीश बियाणी आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.