आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होऊन ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चालला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा तापमानाचा पारा वाढलेला दिसून येतो. परंतु यावर काही प्रमाणात आळा बसवा यासाठी शहरातील महारुद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभेफळ येथील शिक्षक जी. टी. पदार गेल्या चौदा वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. पदार हडको भागातील घराच्या गच्चीवर दरवर्षी विविध झाडांची रोपे तयार करतात. ती राेपे पावसाळ्यात वाटप करून पर्यावरणावर जनजागृती करत आहेत. यंदा पदार यांनी ७ हजार २०० सीड्स बॉलची निर्मिती करून पर्यावरण सरंक्षणाचा संदेश दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक सण, उत्सव, गच्चीवर रोपवाटिका तयार करणे, मोफत बेल वाटप करणे यासोबतच पदार यांनी सीड्स बॉल तयार करण्याचा उपक्रमही हाती घेतला आहे. वर्षभर स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा करून त्या साठवून ठेवतात. यात आंबा, बोर, चिंच, सीताफळ, बदाम, बेल, जांभूळ, रामफळ आदींचा समावेश आहे. या बिया गोळा करून माती भिजवून त्यात टाकल्या जातात. यंदा त्यांनी ७ हजार २०० सीड्स बॉलची निर्मिती केली. सदरील सीड्स बॉल तयार करण्यासाठी मुलगी उत्कर्षा पदार, मुलगा गौरव, पत्नी मीरा, पुतण्या बद्रीनाथ आणि राजे संभाजी कॉलनीतील शुभम गाडेकर, विराज कोंडके, नकुल बदर, अथर्व बदर, सार्थक म्हस्के, शुभम दराडे यांनी सहभाग घेतला. यंदा जागतिक पर्यावरण दिनाचे स्लोगन एकच पृथ्वी असे आहे. त्यानुसार पर्यावरण संवर्धनासाठी सीड्स बॉल तयार केले आहेत. सदरील सीड्स बॉल पर्यावरणप्रेमी संस्था, शाळांना देण्यात येणार आहेत. काही टेकडी, डोंगरपायथा, नदी-नाल्याच्या काठावर या बिया टाकून पेरणी करण्यात येणार आहे. असे जी. टी. पदार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.