आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:औरंगाबादेत स्पुटनिक लसीचे उत्पादन; वोक्हार्टमध्ये चाचण्या अंतिम टप्यात; ...तर हाफकिनच्या अगोदर उत्पादन शक्य

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी कंपनीचे चेअरमन हबील खोराकीवाला यांनी प्रकल्पाला भेट देऊन आढावाही घतला.

औरंगाबादच्या वाेक्हार्ट कंपनीत गेल्या दाेन महिन्यांपासून एका विदेशी काेराेना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र त्याबाबत प्रचंड गाेपनीयता पाळली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रशियन कंपनीच्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीचे या कंपनीत उत्पादन हाेणार असून त्याबाबत विदेशी कंपनीसाेबत करार हाेणार आहे. या चाचण्यांचे अहवाल सादर झाल्यानंतर लगेच वाेक्हार्ट कंपनीत लस उत्पादनाची परवानगी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कंपनीचे चेअरमन हबील खोराकीवाला यांनी प्रकल्पाला भेट देऊन आढावाही घतला.

भारतात सध्या काेविशील्ड, काेव्हॅक्सिन व स्पुटनिक-व्ही या काेराेना प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. मात्र लसींचा माेठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने त्याचे उत्पादन वाढवण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. हैदराबादच्या डाॅ. रेड्डीज लॅबशी रशियाच्या स्पुटनिक उत्पादनाशी करार झालेला अाहे. यासाेबतच उत्पादन वाढीसाठी अन्य कंपन्यांशी करार करण्यावरही कंपनीकडून भर दिला जात आहे.

एफडीएच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाेक्हार्ट कंपनीला विदेशी लसीच्या चाचण्यांचे लायसन्स तीन वर्षांसाठी देण्यात आलेले आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी विदेशी कंपनीसाेबत लसीचे उत्पादन किती करायचे व त्याची किंमत किती ठेवायची याबाबत करार करणार आहे. आता चाचण्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हा करार हाेऊन उत्पादन सुरू हाेऊ शकेल.

ज्या लसीचे उत्पादन वाेक्हार्टमध्ये घेतले जाईल त्याच्या वापरास भारतात परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे या कंपनीत स्पुटनिक व्हीचेच उत्पादन हाेणार असल्याच्या चर्चेला उच्चस्तरीय सूत्रांनी दुजाेरा दिला. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या परवानगीने हे उत्पादन सुरू केले जाणार आहे. मात्र त्याबाबत सध्या प्रचंड गाेपनीयता पाळली जात आहे.

...तर हाफकिनच्या अगोदर उत्पादन शक्य
केंद्र सरकारने मुंबईच्या ‘हाफकिन’मध्ये स्वदेशी लस काेव्हॅक्सिनच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. मात्र त्याचे साेपस्कार अजून पूर्ण झालेले नाहीत. त्यापूर्वी वाेक्हार्टमध्ये स्पुटनिकचे उत्पादन सुरू हाेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...