आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:सात वर्षांपूर्वी विद्यार्थिनीस धडक देणाऱ्या प्राध्यापकाला कारावास; निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल शिक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

निष्काळजीपणे वाहन चालवून परीक्षा देण्यास जाणाऱ्या विद्यार्थिनीला धडक देऊन जखमी केले. जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांना मारहाण करून जखमीही केले. याप्रकरणी वाहनचालक प्रा. भारत उत्तमराव सोनवणे (५४, रा. श्रेयनगर) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी आठ दिवसांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जखमी विद्यार्थिनीला नुकसान भरपाई म्हणून एक हजार रुपये देण्‍याचे आदेशही दिले.

श्रेयनगरात राहणारे दिनेश श्यामलाल खंडेलवाल (५२) हे २३ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी मुलगी मोहिनी विवेकानंद कॉलेज या परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गेले हाेते. कॉलेजच्या गेटसमोर सोनवणे याने निष्काळजीपणे कार (एमएच १५ बीडी ७५५५) चालवून मोहिनीला पाठीमागून धडक दिली. यात पायाला मार लागून ती जखमी झाली. याचा जाब विचारणाऱ्या दिनेश यांना सोनवणे याने मारहाण की. तसेच पोलिसात तक्रार न देण्यासाठी धमकीही दिली. तरीही दिनेश यांनी क्रांती चौक पोलिसात तक्रार दिली त्यावरुन सोनवणेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.

बातम्या आणखी आहेत...