आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकारने सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माधमातुन जिल्ह्यातील आठ हजार शिक्षकांची प्रोफाइल तयार करण्यात येत आहे, ही प्रोफाइल तयार होत असताना ती योग्य आहे की नाही ? याची शिक्षकांनी खात्री करावी व प्रक्रिया बाबत जागृत राहावे अशा सूचना औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केल्या आहेत. दरम्यान या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून यात शिक्षकांना दाद मागण्याची संधीही मिळणार आहे.
शिक्षकांच्या बदल्या संदर्भात राज्य सरकारने सॉफ्टवेअरच्या निर्मिती केली आहे. त्यामुळे आता बदल्यांची किचकट प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेकदा घोळ होत असे, परंतु आता प्रत्येक शिक्षकाला एकमेकांची माहिती सॉफ्टवेअरद्वारे सहज पाहता येणार आहे; तसेच दुसऱ्या शिक्षकांची माहिती दुरुस्ती करण्याची सूचना अथवा आक्षेपदेखील नोंदविता येणार आहेत. सर्व शिक्षक आणि अधिकाऱ्यांना डॅशबोर्ड दाखवले जातील. सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती देखील दाखविली जाणार आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी त्यांचा आधार क्रमांकापासून ते वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना साईओंनी दिल्या आहेत. तसेच बदली प्रक्रिया पूर्ण होत असताना शिक्षकांनी आपला लॉ गिन आयडी तसेच पासवर्ड व प्रक्रिया बाबत जागृत राहावे व शिक्षकांनी मुख्यालय राहावे अशा सूचनाही गटणे यांनी दिल्या आहेत.
गट शिक्षणाधिकाऱ्यांना अधिकार
जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांना आपली ऑनलाइन सॉफ्टवेअरवर प्रोफाइल तयार करायची आहे. तयार झालेल्या शिक्षकांची प्रोफईलची तपासणी ती माहिती गट शिक्षणाधिकारी प्रमाणित करणार आहेत. यात न्यालयील बदल्याचे प्रकरणे, शिक्षकांची माहिती प्रमाणित करणे असे अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांकडे करता येईल अपील -
शिक्षकांची प्रोफाइल प्रमाणित करताना शिक्षकांनी आपल्या माहितीत काही बदल झाला असे वाटत असेल तर शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल . तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडुन त्यांचे समाधान न झाल्यास शिक्षकांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडेही अपली करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.