आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांवर अक्षर संस्कार:सातारा येथील आद्येश्वरी सरस्वती उपासनागृहात आज कार्यक्रम

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत पंचमीनिमीत्त सातारा परिसरातील खंडोबा मंदिर मार्गावरील आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासनागृहात २६ जानेवारी रोजी दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान चिमुकल्यांवर अक्षर संस्कार करणारे पाटी पेन्सील पूजन होईल. दुपारी १२ ते २ दरम्यान उदयोन्मुख कलाकार युगंधरा केचे आणि आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार प्रा.गजानन केचे गायन सादर करतील.

दुपारी ४ ते ४:३० दरम्यान देवीची आरती, ४.३०-५.१५ दरम्यान राम निकम यांचे कथाकथन, सायं. ५.१५-६ दरम्यान डॉ. नरेंद्र कुलकर्णी आणि उद्याेजक फुलचंद जैन यांचा सत्कार, तर सायं. ६-७ दरम्यान शुभम बोराडे आणि सुदर्शन दिलवाले यांचे गायन आणि एस. गणेश यांचे तबला वादन होईल. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्याम खांबेकर, गीता खांबेकर, सुमीत खांबेकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...