आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मालमत्ता कर थकला, तीन दुकाने सील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने सतपालनगर, पहाडसिंगपुरा आणि तारासाहेब मार्केट सिटी चौक येथील तीन व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे असलेली थकीत कर वसुलीसाठी तीन दुकानांना सील ठोकले.मनपाने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक झोन कार्यालयांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. व्यावसायिक मालमत्ताकडील करवसुलीसाठी मालमत्ता सील व जप्तीची कारवाई केली जात आहे.

झोन क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रातील सतपालनगर, पहाडसिंगपुरा येथील कमलाबाई माणिकचंद छाजेड यांच्याकडे ४२ हजार ८११ रुपयांच्या कराचा भरणा केला नसल्यामुळे त्यांच्या मालकीचे एक दुकान सील करण्यात आले. तसेच तारासाहेब मार्केट, सिटी चौक येथील एन.एक्स. ड्रेस लँड यांच्याकडे १ लाखाचा कर थकला असून त्यांनी तो भरला नसल्याने त्यांची दोन दुकाने सील करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...