आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:डेल्टाच्या नमुने तपासणीसाठी घाटीकडून मशिनरीचा प्रस्ताव, अडीच कोटींचा येणार खर्च

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. सध्या मराठवाड्यातील डेल्टाचे संशयित नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवले जातात. मात्र या तपासणीसाठी अद्ययावत मशिनरी मिळावी यासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव एक पाठवला आहे. त्यात दीड कोटीची मशिनरी आणि केमिकलसह इतर साहित्यासाठी साधारणत: एक कोटी रुपये असा एकूण असा अडीच कोटींचा खर्च येणार आहे. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या की, घाटीतून रोज डेल्टा संशयित ३० ते ४० नमुने पुण्याच्या एनआयव्हीला साधारण पाठवले जातात. घाटीच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत ही मशिनरी बसवल्यास इथेच डेल्टाचे निदान करता येणे शक्य आहे. घाटीतल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोनाचे नमुने तपासले जातात. प्रस्ताव मंजूर होऊन मशीन बसवल्यास महिनाभरात डेल्टाचे नमुने तपासता येतील.

मराठवाडा-विदर्भात डेल्टाचे रुग्ण नाहीत
औरंगाबाद विभागात अद्याप डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले नसल्याची माहिती आरोग्य उपसंचालक स्वप्निल लाळे यांनी दिली. घाटीतल्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, पहिल्या लाटेत मृत्युसंख्या जास्त होती, तर दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली. विदर्भातही डेल्टाचे रुग्ण आढळले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...