आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना ते नांदेडपर्यत समृद्धी महामार्गासाठी ५ हजार कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी लवकर नोटिफिकेशन निघणार असून मार्च २०२२ पर्यंत हे भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनदेखील याच जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या बाजूने नेण्यात यावी यासाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्यााचे सार्वजनिक बांंधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी चव्हाण म्हणाले की, जालना-परभणी-हिंगोली-नांदेड हा रस्ता १९० किमीचा असून हा रस्ता थेट तेलंगणापर्यंत व्हावा यासाठी नितीन गडकरी यांना देखील विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढचा रस्ता नॅशनल हायवेने केला तर हैदराबादपर्यत जोडता येणार आहे. जालना-नांदेड समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर सहा तासांत पूर्ण करता येणार आहे.
पंधरा हजार कोटींचे टेंडर महिनाभरात निघणार
राज्यात महिनाभरात नवीन रस्त्यासाठी आशियाई विकास बॅकेच्या वतीने टेंडर काढण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.. विशेष म्हणजे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे असणार आहेत. आशियाई विकास बँकेकडून भाग दोन मंजुरी मिळाली आहे. राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्ते दुरुस्तीसाठीही निधीची कमतरता भासणार नाही.. राज्यात ९२ पूल आहेत. ज्या पुलाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी ५४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यासाठी मंजुरी मिळाली आहे.. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार सुभाष झांबड, नामदेव पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना दिले पत्र
चव्हाण म्हणाले की, मी रावसाहेब दानवे यांना भेटलो आहे. हा मार्ग बुलेट ट्रेनने जोडला तर मराठवाड्याचा फायदा होईल. त्यासाठी राज्य सरकार भूसंपादन करण्याची कारवाई करणार आहे. त्यांच्या कारकीर्दीत ही ट्रेन होईल. मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधानांना विनंती करणारे पत्र दिले आहे. आपला बुलेट ट्रेन मार्ग औरंगाबाद-पुणे-मुंबई नांदेड-हैदराबाद या नॅशनल हायवेने जोडला जावा. पुण्याला देखील मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मुले शिकायला जातात. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्याची संख्या अधिक आहे.
मराठवाड्यात ५४२ कोटींचे नुकसान : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ५४२ कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये आठही जिल्ह्यांतील ९२ पुलांचे नुकसान झाले आहे. जुन्या काळातील हे पूल असून उंची कमी असल्यामुळे आणि पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या पुलांचे नुकसान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.