आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज परिसरातील रांजणगाव भागात एका नागरी वसाहतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली. त्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी डमी ग्राहक पाठवून खातरजमा करून छापा टाकला. यात महिला, तरुणींकडून ५०० रुपयांवर देहविक्री करून घेणाऱ्या शोभा पंढरीनाथ मुजमुळे हिला अटक केली. डमी ग्राहक पाठवताना पोलिसांनी त्याला व्यवहार ठरताच खिडकीतून बाहेर थुंकून डोक्यावरून हात फिरवण्याचा इशारा सांगितला होता. त्याने तो करताच दबा धरून बसलेले पोलिस तत्काळ आत शिरले. या वेळी पाेलिसांना साडेसहा हजारांचा ऐवजही मिळून आला.
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना गुप्त बातमीदाराकडून व्यवसायाविषयी माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी दुपारी २ वाजता पथकासह सापळ्याचे नियोजन केले. हा प्रकार रांजणगावातील हारुण चौधरी यांच्या इमारतीत सुरू होता. गुरमे पथकासह इमारतीपासून काही अंतरावर उभे राहिले. डमी ग्राहक आत जाताच २:३० वाजता त्याने मुजमुळेसोबत व्यवहार केला. ५०० रुपयांत व्यवहार ठरला. त्यानंतर त्याने थुंकून डोक्यावरून हात फिरवताच पथकाने थेट इमारतीमध्ये प्रवेश केला. या वेळी १२ आणि १३ च्या खोलीत एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली.
मुजमुळेवर गुन्हा दाखल मुजमुळेवर पोलिसांनी स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम (पिटा अॅक्ट) कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले. स्थानिक परिसरातील गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढणे सुरू होते. यापूर्वी सुमारे ९ ते १० तरुण महिलांना घेऊन वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.