आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:तुमच्या मुलाला ‘स्क्रीन जंकी’ होण्यापासून वाचवा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक आई आपल्या चार वर्षांच्या मुलाला एका हाताने ओढत होती, दुसऱ्या हातात सामान होते. विमानाचे बोर्डिंग पास बोटात अडकवले होते. ती सीट नंबर शोधत होती. पण मुलाला याच्याशी काही घेणे-देणे नव्हते. तो विमानात बसणार असल्याचेही त्याला काही उत्साह नव्हता. विमानात त्याच्या वयासारखी मुले आहेत की नाहीत याच्याशीही त्याला काही घेणे-देणे नव्हते. तो मात्र मोबाइलमध्ये गुंग होता. तो त्याच्या दुसऱ्या हातात होता. कार्टून पाहून तो हसत होता. त्याच्या आईला सीट सापडली. ती मुलाचा हात सोडत कंपार्टमेंटमध्ये सामान ठेवू लागली. मात्र मुलगा पुढे चालत गेला. हात तसाच वर ठेवला, जणू काही कोणी धरले आहे, आपण कुठे चाललो याची त्याला जाणीव नव्हती. त्याची नजर मोबाइल स्क्रीनवर होती. त्यामुळे तो एका एअर होस्टेसला जाऊन धडकला. ती एका प्रवाशाची मदत करत होती. तेव्हा त्याला कळाले ही माझी आई नाही. त्यामुळे तो थोडा घाबरला. तेव्हा होस्टेसने त्याचा हात धरला आणि त्याला त्याच्या आईकडे घेऊन गेली. त्यानंतर मुलगा पुन्हा मोबाइल पाहू लागला. त्याने आपल्या आईला पाहून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मोबाइलमध्ये कार्टून पाहण्यात तो पुन्हा दंग झाला. आई त्याला म्हणाली, तू पाहून चालू शकत नाही का? तेव्हा तो म्हणाला, मला त्रास देऊ नको.

शनिवारी चेन्नईच्या विमानातून जात असताना मला हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. प्रवासादरम्यान मी आईशी बोलण्याचा निर्णय घेतला. वीस मिनिटांच्या चर्चेत मुलाने मला एकदाही पाहिले नाही. स्वाभाविक मी काही कार्टूनसारखा मजेदार नव्हतो. तरी मी त्याला कथा आणि गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, २०२० मध्ये संपूर्ण देशाला एका नवीन विषाणूचा आणि त्यामुळे लॉकडाऊनचा सामना करावा लागला. या काळात या आयटी तज्ज्ञ आई व्हर्च्युअल मीटिंग्ज, घरातील कामे आणि मुख्य म्हणजे तिच्या दोन वर्षांच्या अत्यंत अॅक्टिव्ह मुलाला व्यग्र ठेवण्यासाठी संघर्ष करत राहिली. बाकीच्या त्रासलेल्या पालकांप्रमाणे तिलाही एक उपाय दिसला तो म्हणजे स्मार्टफोन. आता दोन वर्षांनंतर आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. पण आईसमोर एक नवीन समस्या उभी ठाकली आहे. मुलाला स्क्रीनचे व्यसन जडले आहे. परिणामत: २ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांचे जास्त स्क्रीन पाहणे, चष्म्याची वाढती संख्या आणि वास्तविक जगाशी जुळवून घेण्यात न्यूरॉलॉजिकल रोग यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. थोडक्यात, तो आता ‘स्क्रीन जंकी’ झाला आहे.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने २०२१ मध्ये पालकांसाठी स्क्रीनसंबंधित सूचना जारी केल्या होत्या, ज्यामध्ये म्हटले होते की, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारची स्क्रीन दाखवू नये. सात वर्षांच्या मुलांना जेवण करताना स्क्रीन दाखवू नये. मुलांनी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहायला हव्यात, ज्यामुळे मुलांच्या मानसिक विकासास मदत होते.

एन. रघुरामन

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...