आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटिव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेवर काळी फुली मारून व आसुडने हाणून निषेध नोंदवण्यात आला.
तसेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या चुकीच्या विधानाचाही खरपूस समाचार घेऊन त्यांचाही तीव्र शब्दांत निषेध करून निषेध सप्ताह समारोप करण्यात आला. यानंतरही राज्यपालांना हटवले नाहीतर बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे शिवप्रेमींनी सांगितले.
डिलीटपदवीदान समारंभात राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केले होते. या अगोदरही त्यांनी थोर महापुरुषांविषयी अपशब्द काढले होते. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारे सातत्याने चुका करत आहे. त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई केंद्र सरकार, राष्ट्रपती करत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या नेतत्वात शिवप्रेमींनी सात दिवस निषेध सप्ताह राबवला.
यामध्ये गत रविवारी दर्गा व सुतगीरणी चौकातील मंत्री अतुल सावे आणि रावसाहेब दानवे च्या घरासमोर ढोल वादन, क्रांती चौकात राष्ट्रपतींना पत्र पाठवणे, बॅनरवर स्वाक्षरी मोहिम, गारखेडा परिसर हनुमान नगर येथे बालगोपालांकडून राज्यपालांचा तीव्र प्रकारे निषेध, मुकूंदवाडी थाळी वाजवून आणि सिडको एन येथे शिट्टी वाजवून शनिवारी टिव्ही सेंटर येथे आसूड मारो, पोस्टर्स फडून आंदोलन करून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने तातडीने राज्यपालांना परत बोलवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. अन्यथा लवकरच बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कर्मवीर भावराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असे चुकीचे विधान करणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप पक्षश्रेष्ठींनी वाचाळविरांना आवर घालावा. त्यांची महत्त्वाच्या पदावरून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी केली. आंदोलनात चंद्रकांत भराट, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, अशोक मोरे, पंढरीनाथ गोडसे पाटील, विनोद पाटील, सतीश वेताळ, सुरेश वाकडे, विकीराजे पाटील, सचिन मिसाळ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.