आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या व निदर्शने आंदोलन

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • सरकारला जाग करण्यासाठी गोंधळ जागर

मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने क्रांती चौकात गत दोन दिवसांपासून ठिय्या व निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी गोंधळ जागार घालण्यात आला. संभळ, तुणतुणे, डफावर गाणी गाणे व त्यावर मुरळीचा डान्सने या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व काही वेळ मनोरंजन देखील केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गोरगरीबांना प्रमुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मात्र, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले गेले. कोपर्डी अमुनाष घटनेनंतर सकल मराठा समाजाच्या सयमाचा बांध फुटला व ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लाखो महिला पुरुष मराठा बांधव रस्त्यावर उतरले. त्याची सुरुवात औरंगाबादेतून २०१६ मध्ये क्रांती चौकातून व मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली मुक मोर्चाने झाली होती. त्यानंतर ५८ मुक मोर्चे निघाले. यामुळे भाजप शिवसेना सरकार हदरून गेले होते. सर्व मागण्या मान्य करून त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात अंमलबजावणी संथगतीने होत आहे. अनेक मागण्यांची पूर्तता झालेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुकऐवजी मराठा क्रांती ठोक मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. ४२ मराठा तरुणांनी आत्मबिलदान दिले. यामुळे वातावरण आणखीन ढवळून निघाले. महाराष्ट्र, महानगर बंद आंदोलनाने रान उठवले. सत्ता परिवर्तन आणि कोरोना संसर्गामुळे काही दिवस आंदोलन बंद पडले होते. समस्या कायम असल्याने अशा परिस्थितीतही मराठा समन्वयकांनी सरकारला जाग करण्यासाठी ठिय्या आंदोलन, गोंधळ जागर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

समाजाच्या नावाने खाऊ नका, आम्ही चेहरा उघडा पाडणार

मराठा क्रांती मोर्चा शांततेत व संयमाने आपल्या मागण्या मांडल्या जातात. तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आक्रमक आंदोलन केली जात आहे. दोन गटात काही मुद्यावरून मतभेद आहेत. उद्देश मात्र, समाजहित ठेवण्यात आला आहे. असे असले तरी काही महाठग समाजाच्या नावाने आंदोलन करून राजकीय पक्षांकडून खाऊपणा करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अशा मराठा समन्वयकांना रंगेहात पकडून समाजासमोर त्यांचा चेहरा उघडा करण्यासाठी काही सुज्ञ मराठा समन्वयक कामाला लागल्याचेही ज्येष्ठ मराठा समन्वयकांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

सरकार कुणाचेही असो, प्रश्न सुटले पाहिजे

सरकार कोणत्या पक्षाचे या बद्दल मराठा समाजाला काही देणे घेणे नाही. जो मराठा समाजाचे प्रश्न तातडीने सोडवेल त्याचा पाठीमागे मराठा समाज उभा राहतो. भाजप शिवसेना सरकार होते तेव्हा ५८ मोर्चे काढले होते. त्यामुळे आंदोलनात राजकारण कुणी आणू नये, असे आवाहन देखील मराठा समन्वयकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...