आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दुर्योधनाचे राज्य:बिलकिस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडल्याच्या निषेधार्थ आंदोलन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीदरम्यान बिलकिस बानोवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याच्या निषेधार्थ यूथ फॉर डेमॉक्रसी संघटनेच्या युवकांनी क्रांती चौक येथे निषेध केला. देशात श्रीकृष्णाचे नव्हे, दुर्योधनाचे राज्य असल्याची टीका संघटनेचे अक्षय पाटील यांनी केली. बिलकिस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या ११ जणांची गुजरात सरकारने मुक्तता केली. गुन्हेगारांचा काही लोकांनी सत्कारही केल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ क्रांती चौकात २१ ऑगस्ट रोजी यूथ फॉर डेमॉक्रसीतर्फे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी युवकांनी गुजरात सरकारच्या विरोधात हातात फलक घेऊन सरकारचा निषेध केला. असे कृत्य हिंदू धर्माला बदनाम करत असल्याचे युवकांनी भाषणात म्हटले. तसेच आरोपींना पुन्हा शिक्षा देण्याची मागणी केली. या वेळी अक्षय पाटील, भारत चव्हाण, कय्युम खान, सादिक शेख, डॉ. अमोल धनदरे, महेश घरत, प्रतीक पाटील, गणेश खोसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...