आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भाजयुमोतर्फे टीव्ही सेंटर चौकात अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी टीव्ही सेंटर चौकात अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला. पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते” असे उद्गार छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काढल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष राजगौरव वानखेडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज भारस्कर, प्रभारी अनिल पाटील, मुकेश जैन, सरचिटणीस दीपक खोतकर, सौरभ शिंदे, राहुल नरोटे, राहुल रोजतकर, सागर पाले, राजू पळसकर, राजु अंधुरे, सतीश ताठे,भीमा धर्मे, बंटी सोनवने, मुकेश चित्रक, राज राठोड, बाबासाहेब गवळी, रोहितकुमार साबळे, सुनील वाणी, राहुल दांडगे, योगेश भाकरे, बंडू ठुबे, सुभाष तांगड़े, संग्राम अतकरे,अविनाश पवार,आकाश अंतरकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...