आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे आंदोलन:पाेस्ट कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती, मागण्यांचे बॅज लावून आंदोलन

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन, पोस्टमन व एमटीएस छत्रपती संभाजीनगर येथील टपाल कर्मचाऱ्यांनी १ मार्च रोजी जेवणाच्या वेळेत वा ड्यूटी संपल्यावर काळ्या फिती लावून ऑफिससमोर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन ३ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. टार्गेटच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास बंद करावा, थकीत बिले देण्यात यावीत, पोस्ट व आरएमएसमधील कामाचा अवैज्ञानिक टाइम फॅक्टर याचे पुनरावलोकन करणे, कमलेश चंद्र कमिटीच्या अहवालानुसार जीडीएस प्रवर्गाच्या सर्व मागण्यांचे निवारण करावे, यासाठी आंदोलन देशभर आयोजित केले आहे. महाराष्ट्र-गोवा राज्यात राष्ट्रीय नेते बाळकृष्ण चाळके, सर्कल अध्यक्ष अमोल शिंदे, सर्कल सचिव तथा डेप्युटी सेक्रेटरी जनरल राजेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. तीन दिवस चालणाऱ्या आंदोलनास संघटनेच्या संपूर्ण सभासदांनी पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...