आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ईपीएस 95 पेन्शनचे आंदोलन, पदाधिकारी दिल्लीत दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपीएस ९५ योजनेतील पेन्शनधारकांची केंद्र सरकार सातत्याने फसवणूक करत आहे, असा आरोप करत पेन्शनर्सनी थेट नवी दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी औरंगाबादेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवेदने, निदर्शने करूनही काही उपयोग झाला नाही. म्हणून देशभरातील पाच संघटनांचे सदस्य सात डिसेंबर रोजी जंतरमंतर येथे जमतील. तेथेच त्यांची एक व्यापक परिषद होईल. केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षांविषयी ठराव मंजूर केले जातील. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढून संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...