आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्य महसूल कर्मचारी संघटनांची निदर्शने; मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य महसूल कर्मचारी संघटनांचे कर्मचारी चौथ्या टप्प्यातील आंदोलन म्हणून सोमवारपासून संपावर गेले आहेत. कर्मचारी संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. सर्व महसूल सहायकांची पदे तत्काळ भरा, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची कार्यवाही करा आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष परेश खोसरे, मराठवाडा सरचिटणीस महेंद्र गिरगे, विजय शहाणे, सतीश पेंडसे, विनोद आहेर, राहुल बनसोडे, मंगला पवार, वैभव भाले, योगिता पाटील, ऊर्मिला धारूरकर, शोभा टाक, प्रशांत जाधव, स्नेहल गादगे, विजय पवार, रामदास मोगल, नंदकिशोर घुगे, अनिल भगत, सोमनाथ ताठे, ज्ञानेश्वर लोधे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...