आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्योदय योजना:‘एड्सग्रस्तांना एआरटी औषध, इतर सुविध द्या’ ; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्ही एड्सग्रस्तांना अंत्योदय योजनेचा लाभ, दारिद्र्य रेषेखालील जीवन शिधापत्रिका मिळावी, त्यांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.नेटवर्क ऑफ औरंगाबाद बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही (विहान प्रकल्प ) संस्थेने एड्सग्रस्तांच्या समस्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मांडल्या. या वेळी जिल्हा नियोजन समिती निधीअंतर्गत अत्यावश्यक सेवा व एआरटी औषधांचा पुरवठा करावा, एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अंत्योदय अन्न योजनेचा लाभ तसेच पात्र लाभार्थींना दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका मिळावी, शासकीय योजनेसाठी अनिवार्य असलेले २१ हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी एचआयव्ही व्यक्तींनी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा स्वयंसेवी संस्थेचे पालकत्व पत्र ग्राह्य धरावे. इतर कागदपत्रे शिथिल करावीत, अशा मागण्या संस्थेच्या अध्यक्षा ज्योती वाडेकर, प्रकल्प समन्वयक रवींद्र घोडके, छाया गवई, अनिता पंडित आणि चंद्रमुनी जाधव यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...